बारसे । नामकरण विधी
बाळाला स्वतःची ओळख मिळवून देणारा आयुष्यातला पहिला आणि सर्वात महत्वाचा हा संस्कार म्हणजे बाळाचा नामकरण विधी किंवा बारसे. २७ नक्षत्रांच्या २१२ कला आणि चंद्राची बाळाच्या जन्माच्या वेळची स्थिती याला अनुसरून बाळाच्या नावाचे आद्याक्षर ठरवण्याचा होरा शास्त्रानुसार रिवाज आहे . बाळाच्या जन्माच्या ११ व्या किंवा १२ व्या दिवशी अथवा १०० दिवसानंतर हा नामकरण विधी आयोजला जातो. कार्य निर्विघ्न पार पडावे म्हणून गणेश पूजना सहा गुरुजी इतर विधी करतात ज्यांचा उद्देश बाळाला उदंड आयुष्य, ज्ञान , कीर्ती , भरभराट लाभावी आणि एक चांगला धार्मिक, मेहेनती, दानशूर माणूस म्हणून त्याची प्रगती व्हावी हा असतो.
फुले आणि फुग्यांची बाळाचा पाळणा सजवला जातो आणि बाळाची आई त्याचे ठरवलेले नाम त्याच्या उजव्या कानात कुजबुजते. जमलेल्या बायका आणि आज्या बाळाला पाळण्यात घालून "कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या " म्हणत बाळाला पाळण्यात घालतात. बाळाला आणि त्याच्या आई-बाबांना आरती-औक्षण आणि भेटवस्तू देण्याचा रिवाज आहे
बाळाच्या आप्त स्वकीय आणि समाजात मिसळण्याची सुरुवात करणारा हा सोहळा आनंदाचा , कौतुकाचा आणि संस्मरणीय बनवण्यासाठी सुवर्णा 'ज इव्हेंट आपला सोबती बनेल.
-
स्टेज डेकोरेशन
-
पाळणा सजावट
-
औक्षण तबक सजावट
-
कणकेचे दिवे
-
सजवलेला वरवंटा
-
घुगऱ्या
-
रांगोळ्या
-
आसने आणि पाट
-
समारंभात गायन
वरील सेवांचा लाभ घेण्यासाठी जरूर आम्हाला संपर्क करा आणि आपल्या इच्छा , गरजा आणि बजेट नुसार आपला सोहळा आनंददायी करा .